STORYMIRROR

Shila Ambhure

Inspirational

4  

Shila Ambhure

Inspirational

गुरु रविदास

गुरु रविदास

1 min
1.1K



(काव्यांजली)


वार रविवार

माघ पौर्णिमेचा दिवस

जन्मले रविदास

मांडुरगावी.


अनमोल रत्न

संत शिरोमणि रविदास

पिता राघवदास

जयाचे.


चर्मकार जरी

शिवले ना जोडे

मन दौडे

ईश्वरभक्तित.


रामानंद गुरु

असे गुरुबंधु कबीरा

संत मीरा

शिष्या.


केला उपदेश

चालावा सन्मार्ग सदा

कुकर्म कदा

नकोच.


वापरुनि बोलीभाषा

केला सत्कर्माचा अट्टाहास

भावले जनमनास

दोहे.


'पराधीनता पाप'

केली साहित्यातूनि बंडखोरी

समाजवादाची तुतारी

फुंकली.


गुरु नानक

गाती दोहे ,भजना

चाळीस रचना

गुरुग्रंथसाहेबी.


विचारांतूनि झळके

स्वातंत्र्य,बंधुता,मानवतावाद

एकजुट ,समाजवाद

रविदासाच्या.


राष्ट्रीय संत

असा गुरु रविदास

नमन खास

माझे.


जयंतीस खास

वाहते आज शब्दांजली

लिहून काव्यांजली

नम्रभावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational