गर्भांकुर
गर्भांकुर
तुझं अंकुरल शेत कसं आनंदाला पारावर,
कशी धाऊन येती जशी सरीवर सर !
तिकडे अंकुरला गर्भ झाले प्रीतीचे डोहाळे..
रुपडे तिचे खुलून जाई, कसे तृप्त जगावेगळे!
इकडे खतपाणी पिका तुझी रोजचीच निगा,
तिकडे डोहाळे पुरविता ,जीव होई तगमग!
इकडे भुईतून कसा, कोंब फोफावला ,
तिकडे अंकुरल्या गर्भाचा, तपासही झाला!
इकडे माशागत केली, जीवापाड पिका
तिकडे आलेल्या कोंबाला, जीवितास धोका!
इकडे उभं पीकं डौलदार, काहीच महिन्यात,
तिकडे चर्चां चालू कसा हिचा, होई गर्भपात!
इकडं अंकुरल्या पिकांनी, बंड पुकारला,
एक एक दाण्याचा जणु सडा वाया गेला !
तुझ्या गर्भाची राखण, तूच कर आई,
एक गर्भ जीवाचा जणु, आर्त स्वर आला!
इकडं पिके डोलू लागली, सोनेरी शेतात ,
जशी थिरकली पाउले, कन्येच्या रुपात!
आई बाप माया देती जणु सोनचाफा जपत ..
इकडं अंकुरल शेत, तिकडं अंकुरला गर्भ ,
झालं दोन्हीचा प्रवास, जणु रेशमाची रास !
रास जणु डोलू लागे, कन्येच्या रुपात
जशी आभाळभर माया,
पडली पदारात, पडली पदरात!
