घरटे
घरटे
पाती गवताची आता
बघा आजही वेचते
थोडे थोडे करुन ती
तिचे घरटे विणते
माया तिची किती वेडी
मेहनत किती घेते
चिमुकल्या पिलांसाठी
छान घरटे बांधते
कोणतीही तमा नाही
घेते ती उंच भरारी
बांधण्यास ते घरटे
कितीतरी फेरे मारी
इकडून तिकडून
काड्या बघ जमवते
तिच्या गोंडस पिलांना
येण्यासाठी कष्ट घेते
आवडते मला तिचे
असे खूप कष्ट घेणे
शिकविते मलाही ती
जीवनाचे प्रेम गाणे
