एकदा काय झाले
एकदा काय झाले
एकदा काय झाले सांगीन मी बरी
स्वप्नात आली माझ्या स्वर्गातली परी
अन घेऊन गेली मला बाप्पाच्या घरी
काय सांगू तुला कित्ती कित्ती मजा
म्हणून मी दिली शाळेलाच रजा
देवाच्या घराला बर्फीची गच्ची
पेढ्याला आहे फार गोड रुची
जिन्याला पायऱ्या पुरी चपातीच्या
गोळ्यांच्या काचा लकाकीच्या
परीने मारली क्रीमरोलची काठी
आईची थप्पड बसली माझ्या पाठी
शाळेला जायला वाजले मला सात
नाश्त्याला खाल्ला कालचाच भात
बाईंनी दिल्या छड्या सपसप
घरी येऊन निजलो गपचुप
