एक किरण आशेचा
एक किरण आशेचा
अंधार बोले पणतीला
साऱ्या जगात माझे राज्य
कलियुगात गाजवेन मी
कुविचाराचे अधिराज्य
पणती बोलले अंधाराला
माझा मिणमिणत्या प्रकाशाने
अंध:कारातून मार्ग दावीन
दीन दुबळ्या मनाला आत्मविश्वासाने
एक आशेचा किरण दाखवेन
गरीब लाचार गरजू कष्टकऱ्यांला
कष्ट मेहनत प्रामाणिकपणाचा
बळ देईल जगण्याला
एक आशेचा किरण दाखवेन
अपंग अपाहिच लोकांना
आत्मविश्वासाचे बळ शिकवेल
सकारात्मक जीवन जगण्याला
एक आशेचा किरण दाखवेन
माझ्या गरीब बळीला
दुष्काळाचे सावट घालवून
सपान फुलविण मनाला
एक आशेचा किरण दाखवेन
एक निरागस स्त्री भ्रूणाला
अंधश्रद्धेची काजळी घालवून
जगण्याची आशा देईल जीवनाला
एक आशेचा किरण दाखवेन
माझ्या भारतीय सैनिकांना
जिद्द ,चिकाटी, आत्मविश्वासाने
तोंड देईल विरोधकाला
एक आशेचा किरण दाखवेन
भ्रष्टाचारमुक्त देशाला
तळागाळातून मुळासगट
भ्रष्टाचाराची कीड काढण्याला
एक आशेचा किरण दाखवेन
एक अबला निर्भयाला
वासनाहीन कुविचाराला
आयुष्यातून नष्ट करण्याला
आयुष्यात कधीही नको घाबरू
जिथे मी तिथे नसेल अंधःकार
आयुष्याच्या वळणावर संकटावर मातकरुन
जीवन करेन सफल साकार
