STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy Others

3  

Sarika Jinturkar

Fantasy Others

एक आभाळ मोकळे

एक आभाळ मोकळे

1 min
178

एक आभाळ मोकळे 

आकांक्षा अन् इच्छांचे 

मनास वेड लावणारे 


एक आभाळ मोकळे 

आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे

जमून ते मेघ सावळे अलगद बरसवून देणारे 


एक आभाळ मोकळे 

सर्व हसऱ्या तारकांना

 सुगंधित करून सोडणारे  


एक आभाळ मोकळे

 पुन्हा कवेत घेणारे 

अश्रू सारे वाहून जाऊन

 ओठावरती फक्त हसू उमटवणारे  


एक आभाळ मोकळे 

सुर जीवनाचे जुळवणारे

स्वच्छंद या स्वरांना हलकेच गोंजारणारे


 एक आभाळ मोकळे 

दुविचार दूर करून आयुष्याच्या

 कठीण प्रसंगात ही मनात फक्त सुविचार आणणारे 


एक आभाळ मोकळे 

मुक्त स्वैर नभी भरारी घेण्यासाठी

 पंखात बळ देणारे 

 एक आभाळ मोकळे 

जगण्यास नवी उमेद देऊन  

क्षितिजापलीकडे पोहोचविणारे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy