दया
दया
अनाथांच्या नाथा, तूच साईनाथा
दया मागीतो रे, तुझी मी अनंता ।।धृ।।
तुला काय सांगू, कसे मी रे मागु
मागणे हे सरणार नाही, तुला काय देवू
देणाऱ्यांचे हात व्हावे, भाग्यवंत दाता
दया मागीतो रे, तुझी मी अनंता ।।१।।
मागणे कशाचे, कुणा साठी रडणे
दैवगतीचा खेळ सारा, कशा साठी भांडणे
जैसे कर्म तैसे फळ, मिळे भाग्यवंता
दया मागीतो रे, तुझी मी अनंता ।।२।।
झाले गेले सारे, गंगेला मिळाले
यथासांग कर्म फळे ही, तुझ्या चरणी वाहीले
पैलतिरांचा तू राजा, दीनाचा विधाता
दया मागीतो रे, तुझी मी अनंता ।।३।।
