दुधावरची साय
दुधावरची साय
माय साय दुधावरची
माय सुवास चंदनाची
झिजते लेकरासाठी
माय फुलवात सांजवेळीची
दूध तिचं अमृताची धार
बाळं निजते मांडीवर
होऊनी बिनधास्त
आईच देते तान्हुल्याला आधार
कसं खेळते निवांत
हसते बेधुंद गोलू गोलू
दडते आईच्या कुशीत
जसं कांगारुच पिल्लू
बाळाच्या काळजीत
माय वेडीपिसी होते
पान्हा फुटते पदराआड
बाळं जेव्हा भुकेने रडते
तिच्या दुधाची ती सर
नाही तोड ही अजून
कितीही फेडले तरीही
उरते मातृत्वाचे ऋण
तारा मातेच्या बाळाच्या
किती नाजूक साजूक
दुःख होता चिमण्याला
काळीज तुटते आईचं
प्रेम निरागस माऊलींचं
आहे वात्सल्याची मूर्ती
किती अथांग समुद्र
गाऊ किती तिची कीर्ती
लेकरू झालं कितीही मोठं
तरी माऊलीसाठी ते बालिश असते
किती लाड पुरवू सुचतं नाही
समजदार ते कधीच नसते
