दंभ
दंभ
संत सांगती भले
दंभ पाळू नकोस तू
मांडण्या लिलाव कधी
मन काढू नकोस तू !!!!!
कर्म कांड देवर्धम
बाजूला सारूनी
श्रद्धा असू दे डोळस
अंधश्रधा गाळूनी
जिभेला आवर जरा
सावर जरा तोल तू
मांडण्या लिलाव मन बाहेर काढू नकोस तू.......(1)
घराघरातून झिंगतो
पिवून मुक्त सुरा
असूर बनून छेडीतो
देह तो भलाबूरा
भुंकतो जीव तरी
ना येकत भूपाळी तू
मांडण्या लिलाव कधी मन बाहेर
काढू नकोस तू..........2)
आपुलीच लक्तरे
लटकवून ठेवली
सौंदर्याच्या आतली
बाई तुच लुटली
चेहरा तुझा शोध काळजात तू
मांडण्या लिलाव मन बाहेर
काढू नकोस तू.......3)
