दिवाळी
दिवाळी
अंधार असलेल्या वाटेवर
प्रकाश घेऊन येते..
दिपावली घरी येताना
मांगल्याचा आनंद देते..
अक्षय सुख समृद्धी
येते सर्वांच्याच घरा..
लक्ष्मी उभी असते
आशीर्वाद घेऊन दारा..
विसर पडतो दुःखाचा
वातावरणात चैतन्य येते..
आनंदाच्या भरून ओंजळी
दीपावली मनोबल देते..
स्नेहाचा दीप तेवतो
अन प्रेमाचे अभ्यंग
मायेचा असतो फराळ
नमन ज्येष्ठांना साष्टांग.
दिवाळी भरून राहो
तुझ्या माझ्या मनात
प्रकाश आनंदाचा पसरो
सृष्टीच्या कणाकणात...
