दिसतो अन्याय
दिसतो अन्याय
जीथे कुठे दिसतो अन्याय आहे
तिथे आवाज उठवायला पहिजे
हे प्रथम नागरीकांचे कर्तव्य आहे देशाप्रती आव्हाने झेलली पाहिजे....
ध्येयपुर्ती संकल्पानेच्या ज्योती उजळून
प्रगती पथावर सज्ज व्हावे देशासाठी
नागरिकांनी आपली कर्तव्ये समजून
जवाबदार पणे कार्य करावे सोशितांसाठी .....
संकल्पनेच्या नव्या दिशा उजळण्या
संघर्ष करुया भविष्य घडवण्यासाठी
माझे तुमचे हा भाव सोडूनी द्यावा समृद्ध भुमीचे ऋण फेडण्यासाठी.........
सामान्यांच्या मुलभूत गरजांसाठी
स्वंयसेवी संघ संघटना उभारावे
विकास आणि प्रगतीचे कार्याला
करण्यासाठी सदा तत्पर रहावे.....
डोळेदान,अंगदान,रक्तदान विद्यादान
देवून आपन प्रगल्भ दाता होवूया
अनाथ,पांगळे,वृद्ध गरीब,असहायांचे
मातापिता,बहिनभाऊ,पालक होवूया......
