दिपस्तंभ
दिपस्तंभ
मानवा तुज पाणी दिले
मानवा तुज मानव बनविले
झुगारले असंख्य बंधने लादलेली
तरी कारे झुलतोस ढोल ताशाच्या तालावरती.....
चलाख आहेत काही तुला
शिकार करण्यास निघाले
तुझी स्तुती करुनच काही
तुझे गळे कापण्यास निघाले....
तू तोड रे माणसा तुझ्या
अंधश्रद्धेच्या पाश ,निघ जरा
बाहेर गोषातून बघ कुठे
चालला समाज...
मला उदोउदो ची आस नव्हती
वाटल होतं तू बनावं..
शासन करती जमात..
पण भाऊभाऊच झाले वैरी तुम्ही
कशी साधाल ऐकिची हाक..
जातीवाद्यांनी अजूनही केलेत
जातीत जातीला बंधिस्त
फक्तच बोद्धांनी दिली हाक बाकी
मलिदा खाण्यापुरतचे घेतात
बिंलदर माझे नाव....
घटनेच्या ऐका ऐका पानावर
तुझे अधिकार केले पक्के
तरी कारे तुम्ही शिकूनही
असे भलतीकडेच मारता शीक्के
स्कूल काढा कॉलेजेस काढा
काढा समाजासाठी संस्कार केंद्र
होऊ द्या घडन पिढीची
ऊद्या उभा होईल त्यातून दिपस्तंभ!
