ध्येय वेडा...!
ध्येय वेडा...!
ध्येय वेडा जीव माझा
प्रवाहा विरुद्ध वाहतो
जगावेगळे काहीतरी
सदैव करू पाहतो
प्रवाहपतित जीणे
हृदयास ना पटते
वेगळीच कहाणी
जीवनाची घाटते
ध्येय माझे उज्वल उन्नत
खुणावते सदा मला
एकट्यानेच जावे लागते
काय सांगू तुला
वेडा म्हणतात सारे
अकलेचे तारे तोडुनी
दिला नाद मी त्यांचा
क्षणात बाबा सोडुनी
तांबडे फुटले एकदाचे
ध्येय आले पहा कवेत
श्रमाचे सार्थक झाले
यश इच्छिले येता हातात
एकट्याचा प्रवास झाला
ध्येय इस्पित गाठण्यास
कृथार्थ झाले जीणे माझे
भाग्य उदेले ऊतुंग यश पाहण्यास...!
