ध्वनी लक्ष्मी
ध्वनी लक्ष्मी
माझ्या सुनेला मुलगी झाली
आमच्या घरी लक्ष्मी आली
नाव तिचे "ध्वनी" ठेवले
लोकांना ते फार आवडले
आहे ती सुंदर गोरीपान
ध्रूव म्हणाला फारच छान
ध्रूव तिचा आहे मोठा भाऊ
म्हणतो तिचा गालगुच्चा घेऊ
गाल आहेत तिचे लाल लाल
जशी सफरचंदाची असते साल
गोड गोड ती गाली हसते
क्षणात शांत क्षणात रडते
रुप तिचे आहे मनोहर
भाळले हो मी खरोखर
