Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Comedy

4.0  

Ashok Veer

Comedy

धन्यवाद...

धन्यवाद...

1 min
147


एके दिवशी मी हात जोडले स्वयंपाक घराला, 

आणि म्हणालो बरं झालं 

तू सारं शिकवलंस माझ्या बायकोला.


स्वयंपाकघर बोलले अहो सारी कामे 

तुम्हीच तर करता हे ठाऊक आहे मला, 

तरी पण तुम्ही धन्यवाद देता कसे हो तुमच्या बायकोला. 


मी म्हणालो म्हणूनच तर 

किंमत कामाची कळते तिला,

आणि मी चुकलो जरी तरी समजावून घेते मला.


आता वय झालंय माझं म्हणून 

माझ्याकडून विसरलं जरी काही, 

तरी त्याच गोष्टीला ती 

कधीच धरून बसत नाही.


चहा गोड झाला जरी 

तरी ओरडत नाही कधी, 

फक्त समझ देते मला अशीच अधी मधी.


भांडी घासताना चुकून 

कधी तुटला कपाचा दांडा, 

तरी म्हणते जाऊ द्या हो 

तसाच तो मांडणीवर मांडा.


स्वयंपाक घर म्हणाले 

आल्या गेल्याची सरबराई 

तुम्हीच तर करता की हो, 

मग धन्यवाद बायकोलाच का देत असता हो.


मी म्हणालो 

साऱ्याच कामांची तर तिला माहिती आहे, 

म्हणूनच तर माझ्या कष्टाची तिला किंमत आहे.


स्वयंपाक घराणे ही हे मान्य केले, 

आणि तिच्या बरोबर मलाही धन्यवाद दिले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy