Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Romance

4.0  

Ashok Veer

Romance

वेड मन...

वेड मन...

1 min
11


का छेडलीस तार तू 

या भोळ्या भाबड्या मनाची,

कर फिकीर जरा तू

या अशा कोवळ्या तनाची.


लागली चाहूल अशी ही

आत्ताच त्या जवानीची,

ओलांडली कशी ही सीमा

मीच माझ्या मनाची.


ओढ अशी ही लागली 

त्या गोड प्रेमाची,

तगमग ही वाढू लागली 

या वेड्या जीवाची.


येण्याने तुझ्या अशा 

बहरतात दाही दिशा,

पल्लवीत होतात मनातील 

या साऱ्याच आशा.


समजावू कशा माझ्या

मनातील या भावना,

तुजविण मला आता

क्षणभरही रहावंना.


मिठीत तुझ्या मिळतो 

आनंद स्वर्ग हा सुखाचा,

रोजच यावा असा सोहळा

तुझ्या माझ्या भेटीचा.


घेऊनी मिठीत तुझ्या 

दे स्वर्ग सुखाचा आनंद मजला, 

नाही रे मागत मी याशिवाय

दुसरे काही तुजला...


नाही रे मागत मी याशिवाय

दुसरे काही तुजला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance