मन
मन
आवरू कसं सावरू कसं
मन माझं कोवळं,
घेवू कसं नेसू कसं
हे सारं सोवळं.
करू मी कुठं
मन हे माझं मोकळं,
परक्यांना सांगू कसं
मी मनातील सगळं.
लुटायला टपल्यात
कसं हे कावळं,
टक लावून बघतया
असं हे बावळं.
सोसवंना भार हा
या कोवळ्या ज्वानीचा,
भरवसा ना राहिला
या नराच्या मनीचा.
आवरू कसं सावरू कसं
मन माझं कोवळं,
घेवू कसं नेसू कसं
हे सारं सोवळं
