आठवण
आठवण
येता आठवण तुझी,
काय होते दशा माझी.
कसं सांगू मी तुला,
कळत नाही माझंच मला.
मन माझं होतं अधीर,
मी होऊन जातो बधीर.
विचार फक्त तुझाच करतो,
अन मनातल्या मनात मी झुरतो.
हिंमत होत नाही तुला भेटायची,
माझी अवस्था तुला सांगायची.
मनात आठवून तुझीच आठवतो,
डोळ्यातील अश्रू डोळ्यातच साठवतो.