Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ashok Veer

Inspirational

4.0  

Ashok Veer

Inspirational

रंगमंच आयुष्याचा

रंगमंच आयुष्याचा

1 min
8


आयुष्याच्या रंगमंचावर 

सादरीकरण करतात सारेच,

त्यात असफल होणारेही 

असतात बरेच.


आयुष्याचा रंगमंच 

नाही साधत साऱ्यांनाच,

तो तर भावतो 

अथक प्रयत्नानाच.


आयुष्याचा रंगमंच 

नाही बोलघेवड्यांचा खेळ,

येथे सदानकदाच घालावा लागतो ताळमेळ.


या रंगमंचावर 

करावे लागते रक्ताचे पाणी,

सतत वापरावी लागते 

साखरे सारखी गोड वाणी.


आयुष्याचा रंगमंच 

म्हणजे खडतर प्रवास,

बाळगली सावधानता तर 

यश मिळते हमखास.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational