Ashok Veer

Crime

4.0  

Ashok Veer

Crime

वेदना

वेदना

1 min
13


आधीच छाटल्यात पंख ही 

आमच्या नशीबाची,

नका रे तोडूस लक्तरे 

अशी या देहांची.


देह हा दिसला जरी एकटा,

विचार हा असावा तरी नेटका.


देहा भोवती का भिरभिरतो 

असा हा पाश वासनेचा,

लाभले असे हे सौंदर्य आम्हा 

त्यात दोष तो काय आमचा.


जाणीव का नाही ती 

तुम्हास या वेदनांची,

होळीच केली का तुम्ही 

या साऱ्याच माणूसकीची.


आठवावी शिकवण ती 

त्या जिजाऊ माऊलीची,

अन अंगीकारावी वर्तणूक 

त्या थोर छत्रपतींची.


लाज थोडी तरी बाळगा रे 

या माता भगिनींची,

नका रे तोडूस लक्तरे 

अशी या देहांची.


Rate this content
Log in