बाप हा माझा...
बाप हा माझा...
1 min
13
बाप हा माझा रे तू ही पांडुरंग,
येऊ कसा भेटाया हे ही तूच सांग.
वाट पाहतो ग तो माझी अशी रात्रं दिनी,
भेट ही होते आमुची तीच स्वप्ना मधुनी.
माय माझी सावळी राणी रखमाबाई,
तिला गं भेटाया मला झालीय घाई.
माहेर गं माझं तेचि पंढरपूर,
अठ्ठावीस युगे जुनं तेथे मंदिर.
मंदिरात बाप माझा उभा गं विटेवर,
भेटण्यास त्याला जनता झालीय अधीर.
बांधूनिया शिदोरी सारेच हे वारकरी,
घेती ही धाव त्याच पंढरपुरी.
आतुरता गं लागली त्याच्या गळा भेटीची,
वाट कशी मी धरु त्या ग पंढरीची.
बाप हा माझा रे तू ही पांडुरंग,
येऊ कसा भेटाया हे ही तूच सांग.