पोळी पुरणाची
पोळी पुरणाची
पोळी पुरणाची
वर धार गावरान तुपाची,
आमटी कटाची
अन खीर तांदळाची.
पांढऱ्याशुभ्र भाताला
पिवळ्या वरणाची जोड,
आजीच्या हातच्या जेवणाला
नाही कशाची तोड.
कुरकुरीत कुरडई
सोबतीला भजी,
सारंच बनवताना
थकून गेली आजी.
गुळाचं गुळवणी
त्याला दुधाची साथ,
आजीच्या मदतीला
धावून आले आईचे हात.
बघता बघता
पंचपक्वांनाचा बेत बनला,
खायला मात्र
साराच गोतावळा जमला.
