ऐक ना...
ऐक ना...
नको वाद संवाद हवा,
तुटत चाललेल्या नात्याला तोडगा हवा.
जरी असतील हे आपल्यात मतभेद,
तरी नको होऊ देवूस कधी मनभेद.
घेऊ समजावून आपणच आपल्याला,
नको दाखवूस तमाशा या जगाला.
नको तू असा दूर दूर जाऊ,
आपण गुण्यागोविंदाने राहू.
असेल चूक तुझी किंवा माझी,
मीया बीवी राजी तो क्या करेगा काझी.
