नाव...
नाव...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आपल्याचाच लागेना ठाव,
त्यांनीच केला हृदयावर घाव.
आणून साजूकपणाचा आव,
बोलायला ठेवतच नाही वाव.
करुन सारा असाच हा बनाव,
नक्की केला यांनीच ठराव.
तूच साऱ्यांना आग लाव,
मग चिडवायला साराच गाव.
वाढवून घेतात स्वतःचा भाव,
हे आम्हाला कळत नाही का राव ?