STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

बाप आणि बापच

बाप आणि बापच

1 min
14

अरे कोणी तरी 

समजून घेता का या बापाला,

मुलांशिवाय दुसरं

कोणीच नाही हो ज्याला.


तूच तर तुकडा आहेस

त्याच्या काळजाचा,

त्यात दोष तो काय रे

त्याच्या नशिबाचा.


कोणालाच समजणार नाहीत का 

बापाच्या असह्य वेदना,

अन कोमेजून जाऊ लागलेल्या 

त्या शून्य भावना.


ऐका रे कोणीतरी येणारी

अशी ही आर्त किंकाळी,

उगाच नका रे जाऊ देवू

बिचाऱ्या बापाचा हा बळी.


बापाच्या वेदना समजायला 

बापच व्हावं लागतं का?

आणि बापानं ऐकलं नाही म्हणून काय 

बापाला कोणी वाळीत टाकतं का?


बापाच्या जागेवरुन

विचारांची सुई फिरवून बघा,

मग समजेल तुम्हाला

काय असते त्याची ती जागा.



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy