Ashok Shivram Veer

Inspirational

4.0  

Ashok Shivram Veer

Inspirational

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस

1 min
6


नवी पुस्तके नवी सॅक, 

आईनेच तर केली पॅक.

हातात घेऊन टाईम टेबल,

पुस्तक भरले इतिहास-भूगोल.


नवा पोषाख नवे शूज, 

दीदीने शिकवले करायला युज.

केसांना तेल तोंडाला पावडर,

तीनेच बनवले मलाही सुंदर.


लांबूनच तर पहात होते बाबा,

ते म्हणाले आता थोडे दोघीही थांबा.

बाबांनी दिला टिफिन भरून,

शाळेत मी गेलो तोच घेऊन.


हाताला धरून प्रेमाने,

शाळेत सोडले दादाने.

करून बाय बाय म्हणतो कसा,

मुले म्हणजेच शाळेचा आरसा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational