STORYMIRROR

Sailee Rane

Inspirational

5.0  

Sailee Rane

Inspirational

अंबाडा

अंबाडा

1 min
2.5K


अंबाडा


केसांच्या तुझ्या सैलसर अंबाडा

त्यात तुझा तो नाजूक बांधा

ओठांची झालीय चाफेकळी

नयनांची ती अबोल भाषा


रूप तुझे सोडी हृदयात तीर

सखे ग झालोय घायाळ मी

काळ्याभोर केसांचा अंबाडा

झालोय ग तुझ्या रूपाचा वेडा


चाल तुझी ग असे नखरेल

त्यात सौंदर्य भरले तुझ्यात ठासून

नाही हटत नजर तुझ्यावरून

जीव ओवाळून टाकीन तुझ्यावरून


अंबाडा तो करता थोडा सैल

ओघळणारे लांबसडक केस

तुझ्या रुपाला अजूनच खुलवी

मन माझं मात्र अजूनच भुलवी


चालू नकोस अशी ठुमकत

उमटतील ठसे हृदयावर

यौवन तुझे सखे खुळलेय ग

पाहुनी जीवाची होतेय घालमेल


श्रीमती साईली संदेश राणे,ठाणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational