वृक्ष
वृक्ष
हिरव्या हिरव्या झाडांची,
हिरवी हिरवी पालवी,
हीच आहे मोठी निसर्गाची देणगी .
काळ्या मातीतून बिजांकुर वर येते .
ऊन वारा पाऊस सर्वकाही सोसते,
कष्टाच्या घामणी जमीन ही न्हाऊन निघते .
भेदभाव न करता परोपकार करती,
ऑक्सिजनची कमतरता तेच पूर्ण करी,
झाडे लावा झाडे जगवा.
विधान आहे सत्य .
करुया सुरुवात स्वतःपासूनी.
मिळून करूया हिरवीगार धरती.
