कन्यादान
कन्यादान
1 min
246
कष्टाची कसरत
संपता संपत नाय
बा ला उभ्या आयुष्यात
पाझर फुटत नाय
कसे काय,माहीत नाय
कुठंतरी चुकतय
जपलेल्या फुलातलं
बालपण हरवत हाय
मग 'बा' ला उमजतं
तू चुकीचा नाय
लेक सासरी पाठवणं
हीच आपली परंपरा हाय
उडते धांदल
मग रातची झोप नाय
दिसाचा ही वेळ
कामाला पुरत नाय
गहिवरतो, सावरतो
ओल्या पापण्यात त्या लपवतो
कन्यादानाच्या दिसासाठी
आयुष्यभर राबतो
आठवणी त्या आठवू लागता
अबोल शब्द मात्र व्यक्त होत नाय
लेक चालली सासरला म्हणलं की
'बा'ला पाझर फुटल्या बिगर होत नाय
