विद्यार्थी
विद्यार्थी
1 min
245
परीक्षेच्या वेळी भलतीच मजा येते
प्रश्नपत्रिका पाहून ती ही अनोळखी वाटते
कावरी बावरी नजर सतत भिरभिरते
चांगला शिक्षक येता तो देव माणूस वाटतो
कडक आलेला मास्तर मात्र डोक्यात शिरतो
परीक्षेच्या वेळी मैत्री भलतीच ऊतू येते
चिठ्ठ्या चपाट्यांचा खेळ लपून-छपून चाले
काही दादा काही भाई सर्वच भेटतात
ऐकलं तर आपलं नाही तर ते पुन्हा नडतात
कटाक्ष नजर व अनुभव खुप काही शिकवतात
पदवी घेता सारे पण ज्ञान मात्र नाही
शिक्षणाचा खेळखंडोबा अन विद्यार्थी कलेत ही मागे राही
