शेतकरी
शेतकरी
1 min
259
काळ्या आईचा माझा बाप सेवेकरी
घाम गाळतो मातीत, तेव्हा येत पीक पदरी.
बाप् माझा शेतकरी, करी पंढरीची वारी.
विठुराया सोबतीला, भार जगाचा त्याच्या डोईवरी
काळाच्या ओघाने कशी फिरविली पाठ
कष्ट पाण्यातच गेले, झाली कष्टाचीच राख.
बाप माझा सरणावर ..
तरी भाव नाही त्यास कष्टापरी
डोळ्यातील अश्रू वाहती दिन-रात
कंठ दाटूनी येतो फक्त कष्ट दिसे नशिबात
बाप माझा शेतकरी आहे देशाचा मानकरी
माणुसकीच्या त्या गावातील मेहनतीच्या या राजाला
माझा प्रणाम मनोमनी
