STORYMIRROR

Shalini Wagh

Others

1  

Shalini Wagh

Others

पहिला दिवस (कॉलेज १)

पहिला दिवस (कॉलेज १)

1 min
574

पावसाने भिजलेली ती

कॉलेज मधला पहिला दिवस

आणि बसला झालेला उशीर

मनाच्या शांत कोपऱ्यात

चालू झाली प्रश्र्नांची किरकिर.


गेट मध्ये टाकलेलं पहिलं पाऊल

स्वच्छंद पक्षाप्रमाणे भासणारे विद्यार्थी

मनाला लागलेली स्वप्नांची चाहूल


पुढे चालत चालत वर्ग नवा दिसला

चुकीचा तो वर्ग स्वतःचा तिला भासला

आता मात्र मनाची धडधड वाढली

स्वतःच्या वर्गाचा शोध घेऊ लागली

कसाबसा वर्ग तिला सापडला

नव्या मैत्रिणी नवी नाती जोडण्यास सुरुवात झाली

एक-दोन ओळखीन सोबत दिवस पहिला संपला


घराची ओढ मनात आणि बसची वेध डोळ्यात

आलेली बस पाहून धस्स सुस्कारा तिने सोडला

चेहर्‍यावरचा आनंद परत चेहऱ्यावर झळकला


Rate this content
Log in