वेश्या...
वेश्या...
तीही नसते तयार
कधीच
नग्न होवून
झोपायला कोणाही सोबत
कधी वयात येण्या आधी
कधी तारुण्याच्या उंबरठ्यावर
ती भावगते समाजाची गरज
लैंगिकतेचा आघात सोसत.
स्वप्नांचा चुराडा मिठीत झाल्यावर
कमरेखालच्या धक्क्यांचेही मग काहीच वाटत नाही
त्याच्यावर असलेल पोट ही
कशालाच लाजत नाही.
वर - खाली , उभे - ओणवे , मागुन - पुढे होत
शरीरभर थिजजलेला घामाचा अन् विर्याचा गंध
त्याच्या नाकपुडया विस्फारत शरीर ढिल पडताना
तीला ते झेलावच लागतं तरीही हसत हसत
तासा तासाला बदलाणारे गिऱ्हाईक
माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलतात
पैसे वसुल करण्यासाठी छाती चोखत
स्त्रित्व दोन्ही हातांनी ओरबडून घेतात.
प्रत्येक पुरुषाच्या मनात कधी तरी, कुठे तरी
अशी वेश्या हवीच असते लैंगिकतेच्या खेळात
स्वैर भैर होवून शरीराची भूक शमवण्यासाठी
मात्र धंदेवाली म्हणून वेश्याच बदनाम होतात.
