माय लेकरू
माय लेकरू
लेकरासाठी माय ही
आनंदाची खाण
माय असेल सोबत तर
लेकरु असते अजाण
लेकरासाठी माय असते संपूर्ण विश्व
ममता तिची अपार ,प्रेमाचं देणं
वात्सल्याची करुणा मुर्ती
जिव्हाळ्याचं लेण
लेकरा माय असली गरीब जरी
तुझ्या साठी जीव की प्राण आहे
कमी पडू देणार नाही कसलेही
माझे तुला वचन आहे
सोबत असली माय की
लेकराला काहींचं नसते उण
जगाला ठेवून पायाशी
झोळीत तिच्या जिंदगीचं जिणं
लेकरू हसते माय सुखावते
सोन्याचांदीचे कण वेचते
चारा आणून पिल्यास भरवते
काऊ चिऊ ची गोष्ट सांगते
दुनियादारी ची चिंता नाही
कवेत मायच्या लेकराला
बेधुंद आपल्याच विश्वात
नाही कुणाची तमा
उदरातचं शिकवते माय
लेकराला जिंदगीचा धडा
कुठल्याही विषम परिस्थितीत
देते सन्मानानं जगण्याचं कडा
नालंदा वानखेडे
नागपूर
