आयुष्य
आयुष्य
जीवन म्हणजे आहे तरी काय
कुणी म्हणतात नुसती हाय हाय
जोवर श्वास राहील तोवर जगावं
काहीतरी चांगलं काम करुन जावं
आपल्या आयुष्यात कर्म करावे, राखून सर्व भान
वृक्षांनाही कळत नाही, कधी गळेल कोणतं पान
आयुष्याला शोधला तर फार मोठा अर्थ आहे
स्वार्थी लोकांसाठी आयुष्य फक्त स्वार्थ आहे
आपण केलेल्या चुका आपल्यालाच कळत नाही
आयुष्य हे एकदाच मिळते परत परत मिळत नाही
