अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची
अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची
अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची'
याद येते हरघडी पहिल्या प्रेमाची ||
धडकत्या काळजाचे ते मधुर गाणे
छेडित झंकार ते प्रेमतराने
संगीतसाधना अविरत चालायची
याद येते हरघडी पहिल्या प्रेमाची (१)
होती नशा आगळी, होती अदा निराळी
ती समीप आली, स्रुष्टी आनंदे नाचली
रोमांच उभे राहती, त्या मिष्ट-भुतकाळाची
याद येते हरघडी पहिल्या प्रेमाची (२)
मी धुंदीत, ती मस्तीत होती
मी आतुर होतो, ती अर्पित होती
भेट दोघांची, अपुर्ण रहायची
याद येते हरघडी
पहिल्या प्रेमाची (३)
तीचे मधाळ बोलणे, माझे हळुवार छेडणे
उभारले स्वप्नाचे मनोरे, तोडले कल्पनात तारे
निघुन तास जायचे,दिन अस्तास जायची
याद येते हरघडी पहिल्या प्रेमाची (४)
असे काय घडले, लाटा रौद्र झाल्या,
बोलणे तियचे ह्रुदया भेदुन गेले
आशाच संपली पुन्हा भेटायची
अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची' (५)
साक्ष घ्या हवी तर, तयारी जवाबाची
अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची'
याद येते हरघडी पहिल्या प्रेमाची
अजुन जखम ओली त्या 'प्रेमभंगाची' (६)