STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

बाप रे बाप

बाप रे बाप

1 min
30.1K


बाप नारळा सारखा

जरी भासतो कठोर

प्रेम जिव्हाळा अंतरी

देई भक्कम आधार


बाप पाठवी मुलाला

दूर देशी शिकायला

पाठीवर हात त्याचा

बळ देई उडायला


स्वतः राहून उपाशी

बाप राबतो शेतात

घासभर अन्न तेव्हा

जाते सर्वांच्या पोटात


बोट धरून बापाचे

पुत्र मोठा जेव्हा होतो

मोठ्या संकट समयी

त्याला बाप आठवतो


लेक न्हाती धुती झाली

बाप करी कन्यादान

लेक सासरी जातांना

बाप रडे आक्रंदून


प्रेम क्रोधाचं मिश्रण

बाप आदर्शाची खाण

त्याच्या मार्गाने चालावे

सदा ठेऊनिया जाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational