STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

विद्रोही शिक्षण-(कविता)

विद्रोही शिक्षण-(कविता)

1 min
28.1K


गरीबांच्या शिक्षणाचा गळा कुणी कापला ?

लोकशाहीत शिक्षणावर घाव कुणी घातला ?

समतेच्या विचारांचा इथे घातपात झाला

न्याय शिक्षणाचा गरीबांस कुणी नाही उरला


शिक्षणात विषमतेचा खेळ कुणी मांडला ?

नाही वाली शिक्षणाला,त्यांच्या भविष्यला

होते तळमळ गरीबांची नाही कदर कुणाला

समता शिक्षणाची दिसेना जगाला


गरीब, श्रीमंतीच्या दरीत गरीब शिक्षणास मुकला

अंधारमय त्यांचे जीवन नाही अर्थ जगण्याला

तुटपुंज्या शिक्षणाने, अंधार भविष्याला

महासत्तेच्या युगात त्याला प्रकाश दिसेना


आर्थिक शोषण शिक्षणात, न्याय कुणी का करेना ?

स्वस्त शिक्षणाची बालकाला योजना मिळना

स्वातंत्र्यात त्यांना शिक्षणाचे हक्क का मिळना ?

दर्जेदार शिक्षण असते कुणाच्या घरात


कित्येक उठाव, उद्रेक झाले बंदिस्त

ध्येय वेडी माणसे का दिसेना जगात ?

लोकशाहीची मूल्ये फक्त का पाठ्यपुस्तकात ?

पैसा झाला मोठा ,ध्येय शिक्षणाचे नाही कुणात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational