सोबत.
सोबत.
माहीत नाही उद्या आपण असू की नसू,
म्हणूनच तर आज आपण एकत्र बसू.
काल असलेला सोबती
आज आपल्यात नाही उरला,
समजलेच नाही तो आपल्यातून
निघून कधी गेला.
कोण कधी कसा सोडून जाईल
याचा नाही उरला भरवसा,
सोबत आहे तोपर्यंत तरी
त्यांना समजून घेऊन मनसोक्त हसा.
सोडून गेल्या नंतरच्या रडण्याला
काहीच नसतो अर्थ,
कारण सारेच जीवन हे
असे गेलेले असते व्यर्थ.