डॉक्टर लढाई...
डॉक्टर लढाई...
सैनिकांची लढाई खरी असतें सीमेवरी
पोलिसांची लढाईपुढे थांबते गुन्हेगारी
न्यायाची लढाई असली शंभर हजारी
तरी डॉक्टरची लढाई असतें खरी अलंकारी
वैद्यक फक्त नाव ते धारण करी
खरं त्यांच काम आहे जीवनधारी
कधी बनून एक वैद्यक सल्लागारी
पण उपचार असे जणू आहे गिरीधारी
डॉक्टर खरतर असतात दिप्तकारी
काम असत त्यांच रात्रदिवसभरी
पण हार मानायची नसते तयारी
म्हणूनच ते बनतात खरे अलंकारी
पण ते नाही कोणी जादूगरी
ते वाचवण्याचे प्रयत्न भरपूर करी
देवापुढे तेही आहेच नमस्करी
जीवनाच्या दोरीचा तर देवच अविष्कारी
कधी बनाव लागत मृत्यू साक्षात्कारी
पण देवापुढे कोणाच चालत थोडतरी
पण तरीही आपल्या जीवनाची दोरी
सांभाळून करतात ते काम लई भारी
डॉक्टर खरतर मानव अवतारी
पण त्यांच काम आहे देवासारखं भारी
कित्येकदा देवाचे मानून उपकारी
डॉक्टर बनतो आयुष्याचा खरा अवतारी.
