डाटा डिलीट झाला...!
डाटा डिलीट झाला...!
जेंव्हा नवीन कविताही
लागली लपंडाव खेळायला....।।धृ।।
काय सांगू माझ्या कवितेची गोष्ट
डिलीट झाली हातून पोष्ट
जेंव्हा नवीन मोबाईल हा
लागला अँप लोड करायला ।।१।।
तुम्हाला सांगतो कालचीच गोष्ट
मोबाईल माझा लै लै बेस्ट
त्याला लागली थोडीशी पेस्ट
मग लागला मीच मीच करायला ।।२।।
कविता माझी लै लै भारी
करायची रोज ती ग्रुपवर वारी
मिळायची तिला लाईकची सारी
लागली राज्यात नाचायला ।।३।।
आज अचानक गायब झाली
संगतीन साऱ्यांना घेऊन गेली
बोंबलायची पाळी मजवर आली
लागली लपंडाव खेळायला ।।४।।
कोणीतरी त्यांना शोधून आणा
गावभर फिरत्यात आवर घाला
शोधून दमलो झाला घोटाळा
लागली आठवण यायला ।।५।।
