चुगली, मानवता वारी
चुगली, मानवता वारी
मानवता वारी
दिक्षाभुमीची वारी,
निघाली नागपुरी
नागनदीच्या तीरी,
भरली दिक्षाभुमीवरी...
जोरसे बोलो जयभीम,
जयघोष नारा गरजती
शुभ्र वस्त्र धारण करुनी,
पाऊल टाकती दिक्षा मैदानात...
रांगेत हातात हात घेई,
चालत चालत पुढे जाई पुढे पुढे पुढे
उपासक, उपासीका जाई,
नतमस्तक होई दिक्षाभुमीपुढे...
सहज कठत कठत रांगेत,
वाट ती गर्दीची कठीण.
मुलमंत्रात तल्लीन बाबाच्या,
बुद्धम्, शरणम् गच्छामीच्या श्रद्धान...
मज ओढ नागपुरची,
अथक चाल चालणे
कष्ट न जाणणे चालून चालून,
आत भाव घेऊन नतमस्तक होणे...
बाबासाहेब दृष्टिस पडे
शिवकण कानी,
असा
जगात झाला नाही कोणी
धम्म दिला आहे बुद्धाचे एक
वर्तन ठेवा रे नेक गेले बाबा सांगुनी...
-----
चु बाई चु
चु बाई चु, चुगली चुs
चहाडी लावतेस अशी
माझेशी तू गंs माझेशी तू...
तू बोलली, मी बोललो
दोघीमधला संवाद असा
आता झगडा आला घरी
खरं खोटं कराया येई ना कोणी...
आता चु बाई चुगली चु...
घराजवळ तुझ्या मी अन्
माझ्या घराजवळ एकूतु
एकमेकीच्या समोरासमोर
निघु तुरु तुरु तुरु...
आता चु बाई चु चुगली...
एक थापड मी मारते
अन् दुजी थापड तू
दे दणा दण दणा दे
ताल सुरात गाणे गाऊ आता...
चु बाई चु चुगली...