चारोळी
चारोळी
मेहंदी रंगते हातावर
खुलून दिसते दिलावर
कधी बोलवणार लावायला
जिजुसोबत आवर्जुन येणार
मेहंदी लावली
तुझ्या नावाची
कधी कळणार प्रेम माझे
जाणीव कर प्रेमाची
रेखाटणार मेहंदी मी
तुझ्या गॊऱ्या हातावर
येवला पैठणी लावून
नाचणार डिजेच्या तालावर
लाॅकडाऊन जाऊ दे
मेहंदी देते काढून
जीवनाची सुरुवात करु
याच जन्मात राहुन
मेहंदी लावते
तळहातावर
प्रेम करतो मी
तुझ्या गोड स्वभावावर
मेहंदीसारखे रंग भरणार
मनाच्या काना कोपऱ्यात
कैद होऊ आपण दोघेही
राघु मैना शोभे पिजऱ्यात
दीदीच्या हातावर मेहंदी
काढताना हिरमुसू नको
यमुना गंगाला सांग
दोन नयनांतून वाहू नको
संसारात आहे नवरंग
मेहंदीत रंगतात एक
सुख दु:खाच्या वाटेवर
प्रेमाचे रंग आहेत अनेक
जाऊ चारोळी गावा
लावते मेहंदी दुल्हनची
हातावर रंगणार बहरदार
पसंत तुला सोबतची
मेहंदी लावली मी
दोन्ही हाताला
टी टाईम झाला
आता चहा पिता येणार मला
सवत माझी आली
मेहंदीचा सारा रंग
पाणी लावून उतरवली
बसली येऊन जिजु संग
हातावर काढली मेहंदी
पण अजून नाही रंगली
तुला म्हणून सांगते
माझं नाव घेताना लाज नाही वाटली
कीर्तीचे गुण
किती गाऊ 
;
ती आहे उंदिर तर
मी आहे म्याऊ
वाट तुझी पाहाता
रात्र निघुन गेली
भाकरीचा तुकडा
शोधण्यात जिंदगी गेली
तुला माहीत आहे का
मी तुझी किती वाट बघते
तू येण्यानं जीवन
माझे फुलते
एवढी का रे
माझी वाट पाहातो
जवळ असल्यावर मात्र
तू दूर दूर राहातो
पाहा थोडी अजून
माझी वाट
जाऊ नको हिरमुसून
नक्की होईल रे भेट
विसरु नको स्वत:ला
शब्द अबोल जरी असले
तरी शब्दातून उच्चार येतो
वाट पाहून तुझ्यात रममाण झाले
का बघतो वाट माझी
मी ऐवज दुसऱ्याचा
वेदना जाईल निघून
मित्र भेटला जुना गावचा
मन सुखावते
तुझ्या कुशीत
वाट पाहाते
तू कधी येत
विसरले मी तुझ्या
प्रेमाच्या नादात
वाट पाहात आहे
प्रेम येणार नाही वादात
तुझी वाट पाहुन
अर्ध मेली आहे
आता का पूर्ण
मरण्याची वाट आहे
तुझ्या येण्यानं
जीवनात रंग भरले
वाट पाहून पाहून
आठवणीने बेजार झाले
वाट तुझी पाहाता
डोळ्यात अश्रू आले
तू येणार कधी सांग
माझे देहभान हरपले
तुझ्या प्रेमात मी
कावरी बावरी झाले
नयनात अश्रू वाहे
वाट तुझी पाहाण्यात जीवन गेले