नातं तुझं माझं
नातं तुझं माझं

1 min

11.5K
तुझं माझं नातं
जशी बांधली रेशीम गाठ
तू माझा अन् मी तुझी
साथ जन्माची भेट गाठ.....
सुख दु:खी असू जीवनात
पण राहु सात जन्म सोबत
येती किती संकटे झेलू
पण राहून साथ संगतीत....
तुझं माझं नातं
वरुन बांधली डोर
तुझ्या नावाचा केला
मी साज नवरंगी श्रूंगार....
तुझं माझं नातं
आकाशी चांदणे सात
सात संगतीत रंगू
राहू सात जन्म सोबत....