STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

1 min
219

छत्रपती राजे / भूषण राष्ट्राला

प्रिय रयतेला / महाराज (1)


गुरु दादाजींनी / शिक्षण दिधले

परिपूर्ण दिले / संस्कारही (2)


फौज मावळ्यांची / छोटीशीच परि

मुघलांना जेरी /युक्तीनेच (3)


गुरु रामदास /खलिते धाडिले

मार्ग दावियले /यथार्थचि (4)


खाण सौंदर्याची /सून कल्याणची

माता मानूनचि /धाडियले (5)


पारख नेटकी /रचना व्यूहाची

योजना युक्तिची /सुटकेसी (6)


थोर शूर वीर /छावा शिवबाचा

अबोल पित्याचा /जीव फार (7)


किर्ती पराक्रमे /राजा ज्येष्ठ श्रेष्ठ

मानी महाराष्ट्र /वंदनीय (8)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract