STORYMIRROR

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

छळ

छळ

1 min
8.2K


तुम्हा सांगतो व्यथा,

विवाहितेची कथा...

हृदयी उठेल कळ,

ही गाथा तुम्ही वाचता.....


ओलीच होती हळद अंगावर,

नव्हता उतरला रंग तिचा...

मेंहदी ज्याचा नावाची होती,

त्याने तगादा केला हुंड्याचा...


होती लावण्याची ती खाण,

परी छळले होते दारिद्र्याने...

उरकले गेले ते सावधान,

वय होते तिचे जरी अजाण...


बांधली गेली ती संसाराला,

जशी कपिला कोणी दावणीला ...

नव्हतीच किम्मत तिच्या शब्दाला ,

तो राही तयार फक्त भोगायला ...


नव्या ची नवलाई मग ,

क्षणातच सरुनी गेली.

दुष्ट सटवाईने घातला घाला,

वक्र तिच्यावर तिने नजर टाकली.


सासू, सासरे, दीर नणंदा,

सारे करू लागले तिचाच वांधा.

केले गेले तिच्यावर अनेक दोषारोप ,

मिळू ना शकली तिला सुखाची झोप.


निचपणाचा तिच्याभोवती ,

केला वैरीणींनी मग जाळ..

कूलिनपणाचा तिच्यावर

रचला तो गेला मग आळ..


तिच्या धन्याने तिची सबब ऐकली नाही,

घरच्यांनी आता रचला हो बेत हाही .

ठरले होते हिची करायची खांडोळी ,

कोणी म्हणे करू या होळी.


ठरला बेत त्यांनी तडीस नेला ,

हुंड्यापायी निष्पाप नारीचा जीव गेला.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy