चहा...!
चहा...!
आभाळलेलं वातावरण
आणि जगतिक चहा दिन
घरात माणस इन मिन तीन
वाजलीच नाही बीन
म्हंटल संध्याकाळी
टपरीवर जावं आणि
मस्त मस्त गरम गरम
आलं वेलदोडा चहा प्यावा
पण चहा दिनाच खरतर
बारस जेवलेले बहाद्दर
त्यांच्या गावी काहीच नव्हतं
जस यांचं रोजच फावत
दोन कटिंग हाती येता
दहा रुपयात दिन साजरा झाला
दिवसभर जोपालेला
निषेधाचा झेंडा गळून पडला
हातात कटिंग आणि
मित्र दोघे तिघे सदा फटींग
तरी किल्ला लढवला
आणि दिला शब्द पाळला....!