चैत्राची नवलाई
चैत्राची नवलाई
चैत्राची फुले पालवी,
वसंताच्या आगमना,
आसमंती उष्ण वात,
गंधमोगरा खुणवी मना !! १!!
गरमीच्या उष्ण झळा,
भासती अग्नी ज्वाला,
सजती पळस पांगरा,
गुलमोहर तव बहरला ! २!!
तृप्त करण्या रसना,
आम्रतरु तव मोहरला,
सानथोर गरीब श्रीमंत,
भेदभाव नसे त्याला ! ३!!
ऋतुंचा तो असे राजा,
उच्च अभिरुची घडवी,
वाटली डाळआंब्यांची,
हळदीकुंकाची रुची वाढवी ! ४!!
दिनकराचे करी पूजन,
भाग्य तयाचे जाई पलटून,
यश आणि पद,प्रतिष्ठा,
अंगणी फुलवी चैत्रांगण!! ५!!