STORYMIRROR

Sunita Anabhule

Romance Classics Fantasy

3  

Sunita Anabhule

Romance Classics Fantasy

सावर रे मना

सावर रे मना

1 min
128

घडला असा रे काय गुन्हा,

प्रेम केले मी पुन्हा पुन्हा,

पण तू केला खोटेपणा,

सोडून गेला देवून यातना,

विनविते मी सावर रे मना ।।


प्रेम केले तुझियावरी,

सर्वस्व वाहिले पायावरी,

अर्पून मोहमाया सारी,

चित्ताची माझ्या करुन चोरी,

विनविते मी सावर रे मना ।।


सोडून सुखाचे सारे पाश,

आले मागे तुझ्या सजना,

दुर्दैवाच्या सोडून खुणा, 

लचके तोडून जाऊ नकोना,

विनविते मी सावर रे मना ।।


अंतरीच्या या वेदनांना,

मी किती जपणार ना,

तुझ्या दुःखाची झळ,

तुज कधीतरी बसणार ना,

विनविते मी सावर रे मना ।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance