चैतन्याची गुढी
चैतन्याची गुढी
झालेय चैत्राचे आगमन
नववर्षाचा आलाय सण
गुढीपाडवा मंगल सोहळा
करूया साजरा सारेजण
झालाय उल्लास साऱ्यांना
करू गोडाधोडाचे जेवण
चैतन्याची ही गुढी उभारू
दारी बांधू फुलांचे तोरण
कडुनिंबाचा पाला बांधून
...... अडकवू साखरेच्या गाठी
. गुळखोबऱ्याचा प्रसाद वाटून
उंच उभारू गुढीची काठी
विसरून जाऊ भेदाभेद
अंधश्रद्धेचे निर्मूलन करू
मिळून सारे लहानथोर
पाडव्याचे महत्व स्मरू
शिवरायांनी केली चालू
प्रथा गुढी उभारण्याची
समृद्धीची प्रतिक असुनी
जपूया रूढी मांगल्याची
